Home » अकोल्यात बाबाजी महाराज मठात पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

अकोल्यात बाबाजी महाराज मठात पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

by नवस्वराज
0 comment

अकोला : आध्यात्मिक वारसा जपणार्या शहरातील श्री बाबाजी महाराज मठाला ३५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभली. महाराजांच्या २२३ व्या पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवारपासून भक्तिभावात प्रारंभ झाला. मठामध्ये महाराजांच्या अस्थी आजही कायम असून ललिता पंचमीच्या मुहूर्तावर अभिषेक व पूजन करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

माळीपुरा भागात बाबाजी महाराज मठामध्ये गेल्या ३५० वर्षांहून अधिक काळापासून धार्मिक कार्य सुरू आहे. विश्वनाथ महाराज कोरान्ने यांची सातवी पिढी आता मठाचे कार्य अत्यंत उत्साहाने करीत आहे. पूर्व राजस्थान उदगीर शहरातील विश्वनाथ कोरान्ने महाराजांचे १७०० शतकात अकोल्यात आगमन झाले होते. माळीपुरा भागात त्यांचे निवासस्थान असंन, आजही बाबाजी महाराज मठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचे गुरू तुकोबा महाराजांनी दिक्षा देऊन विश्वनाथ महाराजांना आपले उत्तराधिकारी केले. त्यानंतर विश्वनाथ महाराजांना बाबाजी महाराज नावाने ओळखले जाऊ लागले. बाबाजी महाराजांनंतर कोरान्ने परिवारातील सखाराम महाराजांवर मठाची जबाबदारी आली. त्या नंतरच्या काळात लक्ष्मण महाराज, आकाराम महाराज, अनंत महाराज, यशवंत महाराज यांनी उत्तराधिकारी म्हणून मठाचा कारभार सांभाळला. आता सातव्या पिढीतील पुरुषोत्तम महाराज कोरान्ने सध्या विश्वनाथ महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून कार्य करीत आहेत.

२२३ वर्षांपासून बाबाजी महाराजांच्या अस्थी मठात सुरक्षित आहेत. सोबतच महाराजांची काठी, भिक्षा कटोरी, झोळीदेखील जतन करून ठेवली आहे. मठाचे ते वैशिष्ट्ये मानले जातात. पुण्यतिथी महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. ललिता पंचमीला अस्थिपूजन, अभिषेक करून वर्षातून एकदाच दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. कोजागिरी पौर्णिमेला बाबाजी महाराजांची पुण्यतिथी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!