Home » अवकाळी पावसाने बुलडाण्यात पिकांचे सहा कोटींवर नुकसान

अवकाळी पावसाने बुलडाण्यात पिकांचे सहा कोटींवर नुकसान

by नवस्वराज
0 comment
  • बुलडाणा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. पशुधन हानी व घरांच्या पडझडीमुळेही मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा आकडा सहा कोटींपेक्षाही जास्त आहे. ५८ जनावरांचा पाऊस व गारपिटीमुळे मृत्यू झाला आहे. अडीचशेवर घरे जमिनदोस्त झाली आहेत.

नुकसानीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ७ हजार ८२ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६७९ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. कृषीच्या नुकसानीचा आकडा ६ कोटी २९ लाख रुपये आहे. वीज पडल्याने ५८ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. २६९ घरांची पडझड झाली आहे. ७ व ८ एप्रिल रोजी १८०शेतकऱ्यांचे एक हजार ४७७ हेक्टर तर ९ ते १६ एप्रिल दरम्यान ६३ शेतकऱ्यांचे दोन हजार १७७ हेक्टर, २० एप्रिल रोजी चिखली येथील ५६ शेतकऱ्यांचे २१.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले . २५ ते ३० एप्रिल पर्यंत ४००३ .०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

एप्रिल महिन्यात २५ ते ३० एप्रिल दरम्यान झालेले नुकसान अभूतपूर्व ठरले. ३६२ गावातील ४००३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात ४९ गावातील १९१.६० हेक्टर चिखली मधील १०८ गावांमधील ८९६.३० हेक्टर मोताळा मधील ६६ गावांतील ५४७.२० हेक्टर, मलकापुर मधील ३ गावांतील २१.८० हेक्टर , खामगावातील ५३ गावांचे १४५४.६० हेक्टरवर, शेगाव तालुक्यातील ३ गावांचे १५, नांदुरा तालुक्यातील ३३ गावांचे २३९, मेहकर १० गावांच्या १०२ हेक्टर, देऊळगाव मधील ३७ गावातील ५३५.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ७ व ८ एप्रिल रोजी खामगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले. २३९१ शेतकऱ्यांचे एक हजार ४७७.६९ हेक्टर क्षेत्रावरील दोन कोटी ४८ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १८० शेतकऱ्यांच्या जिरायत शेतीचे ११४.०४ हेक्टर, २०१७ शेतकऱ्यांचे १२३०.४५ हेक्टर बागायतीचे, १९४ शेतकऱ्यांचे १३३.२० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!