Home » Buldhana News : सलग सुट्यामुळे संतनगरी शेगाव प्रचंड गर्दी

Buldhana News : सलग सुट्यामुळे संतनगरी शेगाव प्रचंड गर्दी

by नवस्वराज
0 comment

Shegaon | शेगाव : नाताळच्या काळात आलेल्या सलग तीन सुट्यांमुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भक्तांची मांदियाळी येथे जमली आहे. संतनगरीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनासाठी तसेच आनंद सागर पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम आहे. (Crowd In Gajanan Maharaj Temple Of Shegaon In Buldhana)

नाताळ व वर्षाचा शेवट असल्याने लोकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीचा बेत तयार केला आहे. त्यामुळे बहुतांश भाविक नवीन वर्षाचे स्वागत शेगावात करणार आहे. 31 डिसेंबर रविवारी आला आहे. त्यामुळे आतापासून शेगावात गर्दीत वाढ झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही गर्दी कायम राहणार आहे. श्रींच्या दर्शनासोबतच आनंदसागर येथे जाणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. दर्शनासोबत पर्यटन होत असल्याने सध्या या भागात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शेगावातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हाऊसफूल्ल झाले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!