Home » Banking News : सहकारी बँक परिषद विदर्भ 2024 होणार जानेवारीत

Banking News : सहकारी बँक परिषद विदर्भ 2024 होणार जानेवारीत

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : विदर्भातील सर्व सहकारी बँकांच्या सध्याच्या स्थितीवर मंथन करण्यासाठी, भविष्यातील सुदृढ स्थितीबाबत सिंहावलोकन करण्यासाठी दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई, सहकार भारती- महाराष्ट्र प्रदेश, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला व दी अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी बँक परिषद विदर्भ- 2024 आयोजन हॉटेल अकोल्यात होणार आहे. (Council of Cooperative Banks In Akola By January 2024)

परिषदेमध्ये भारतीय रिझर्व बँक तसेच महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याकडून अभिप्रेत असलेले विविध प्रश्न तसेच समस्यांवर चर्चा होणार आहे. विदर्भातील सर्व बँकांची आर्थिक स्थिती सुदृढ होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे व महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा हे उपस्थित राहून सहकार परिषदेस मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेला विदर्भातील सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तज्ञ्ज संचालक, मुख्य कार्यकारी अधिकार, सरव्यवस्थापक यांनी उपस्थित राहून सहकारी बँकांच्या सुदृढतेसाठी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन दीअकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, दी अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ग्यानचंद गर्ग, उपाध्यक्ष के. जी. देशमुख यांनी केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!