Home » Ratnagiri News : चाफवली गावातील एका झाडाची किंमत 100 कोटी

Ratnagiri News : चाफवली गावातील एका झाडाची किंमत 100 कोटी

by नवस्वराज
0 comment

Ratnagir |रत्नागिरी : रत्नागिरीतील संगमेश्वर तालूक्यात असलेले चाफवली या गावाच्या वनराईत 150 वर्ष जुने एक डेरेदार रक्तचंदनाचे झाड आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूच्या चित्तुर, कडप्पा, कुरूनुल, नेल्लोरा जिल्ह्यातील जंगलात खोलवर भागात हे झाड आढळते. चाफवली येथील झाडाची किंमत 100 कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येते. (Cost of 150 Years Old Raktachandan Tree At Cafavali Of Ratnagiri District Is 100 Crore)

आयुर्वेदिक औषधी, लाकडी मूर्ती व उंची दारू बनवण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करण्यात येतो. विशेष करून चीनमध्ये याला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रक्तचंदनाचा भाव 6 हजार रूपये प्रतिकिलो ईतका आहे. चाफवली येथील हे झाड कोणी लावले याची माहीती नाही. पक्ष्याचा विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांच्या काळात झाड लावण्यात आले असावे, असा अंदाज गावकरी वर्तवतात.

नुकताच प्रदर्शित झालेल्या पुष्पा हा चित्रपट रक्तचंदनाच्या झाडाच्या तस्करीवर आधारित होता. चाफवलीच्या वनराईतील रक्तचंदनाच्या झाडाची किंमत 100 कोटी रूपये असल्यामुळे वनविभाग, महसूल विभागा आणि गावातील नागरीक या झाडाचे 24 तास संरक्षण करतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!