अकोला : अकोल्यात काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद होता माजी महापौर मदन भरगड आणि अभय पाटील यांच्यातील माजी मंत्री अजहर हुसेन यांच्या समोरच हा वाद झाला. हा वाद इतका टोकावर गेला की चक्क अभय पाटील रागाच्या भरात कक्षाच्या बाहेर पडले. त्यानंतर विविध चर्चेला उधाण आलं. दरम्यान भरगड यांना समजलं की पाटील हे रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीकडे गेले. आणि तेही भरगड त्यांच्या वाहनाजवळ पोहचले. परंतु गाडीतून रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गेलो हे लागलेले आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
विविध विषयांवरून काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज चार वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अझर हुसेन, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपापली जागा राखून ठेवत खुर्चीवर बसले होते. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात काँग्रेसचेच पदाधिकारी अभय पाटील येथे दाखल झाले. भरगड म्हणाले, ‘मी’ पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच समोरच्या खुर्चीवर बसलो होतो. पत्रकार परिषद सुरू होताच काही क्षणात तेथे अभय पाटील मला म्हणाले की आपण इथून उठा, मला बसायचं आहे. त्यावेळी मी त्यांना एवढंच म्हणालो की मी पक्षात सीनियर आहे, आणि माजी महापौर देखील राहिलो आहे. त्यामुळे आपण ज्युनिअर असल्यामुळे मागे बसावं आणि ते पाठीमागे बसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी माझ्याशी खुर्चीवर बसण्यावरुन वाद घातला. ते मला रागाच्या भरात म्हणाले की ‘मी’ इथून बाहेर जातो, मी जा म्हटलं आणि ते तिथून निघून गेले. तेवढ्यात काही लोकांकडून समजलं की पाटील हे रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गेले. मी देखील म्हटलं बघतो आणू दया. अशाप्रकारे हा शाब्दिक वाद झाला, त्यांच्या गाडीजवळ बाहेर पण गेलो, मात्र त्यांनी रिव्हॉल्व्हर काढली नाही. विशेष म्हणजे पाहिली नाही, असे भरगड म्हणाले.
पत्रकार परिषद संपल्यानंतर एक पत्रकार माझ्याजवळ आला आणि म्हणाला आपण सर्वांचा ग्रुप फोटो हवाय. त्यासाठी मी ग्रुपमध्ये उभा राहलो. त्यावेळी बाजूला भरगड देखील उभे होते, ते म्हणाले तुम्ही बाहेर जा, मी बाजूला हटलो, इथे बाहेर नाहीये, गेटच्या बाहेर जा. असे म्हणाले. त्यानंतर थोडा शाब्दिक वाद झाला, आणि बाहेर पडलो. पत्रकार दिनेश शुक्ला यांनी मध्यस्थी करत मला गाडीत बसवले आणि आपण शांत रहा आणि मी तिथून शांततेत निघालो. तसं पाहिलं तर माझ्याकडे लायसन्स रिव्हॉल्व्हर आहे, पण अशा प्रकारचे कोणतेही रिव्हॉल्व्हर काढण्याची धमकी मी दिली नाही. रिव्हॉल्व्हर माझ्याकडे असल्याने असा आरोप लावला जात असावा, अशी शक्यता पाटील यांनी व्यक्त केली.