Home » ताजुद्दीन ट्रस्टमध्ये घोटाळा; माजी शहराध्यक्ष अटकेत

ताजुद्दीन ट्रस्टमध्ये घोटाळा; माजी शहराध्यक्ष अटकेत

by नवस्वराज
0 comment

नागपूर : उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये एक कोटी ५९ लाख ५२ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) यांच्यासह माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी यांना रविवार (ता. ७ मे) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

पोलिसांनी त्यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळविली आहे. या प्रकरणात सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख हुसेन हे १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ट्रस्टचे अध्यक्ष होते. पदावर असताना दोघांनी ऑडिट न करता पाच वर्षांत एक कोटी ५९ हजार रुपयांचा अपहार केला. या दोघांचा कालावधी संपल्यानंतर ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४, रा. निराला सोसायटी, मोठा ताजबाग) यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

ताज अहमद अली अहमद सय्यद यांनी ऑडिट करवून घेतले. ऑडिटमध्ये दीड कोटी रुपयांची हेराफेरी असल्याची माहिती समोर आली. त्यातून २२ सप्टेंबर २०२२ ला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा समोर आला. सय्यद यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख हुसेन व माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!