नवी दिल्ली : व्यावसायिकाचा एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा १०१.५० रूपयांनी महागले आहे. नवीन दरवाढी नंतर राजधानी दिल्लीत १९ किलोग्राम एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली आहे.
यापूर्वी १ ऑक्टोबरला गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०९ रूपयांची वाढ करण्यात आली होती. ऑईल मार्केटिंग कंपनीने १९ किलोग्राम व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०१.५० रूपये ईतकी वाढ केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मात्र कुठलीही वाढ करण्यात आलेली नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
१९ किलोग्राम व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दिल्लीत १ हजार ८३३, कोलकाता येथे १ हजार ९४३, चेन्नई मध्ये १ हजार ९९९.५० तर मुंबईत १ हजार ७८५.५० रूपयांना मिळेल. एका महिन्याच्या अंतराने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरांमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे हॉटेलिंगच्या शौकिनांना महागाईचा फटका बसणार आहे.