Home » बुलढाण्यात शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे रंगतेय नाट्य

बुलढाण्यात शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे रंगतेय नाट्य

by नवस्वराज
0 comment

बुलढाणा : एकनाथ शिंदे गटातही आलबेल नसल्याचे चित्र आहे. बुलढाण्यातील शिंदे गटातील गटबाजी तीव्र झाली आहे. बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख हे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासोबत ओल्या पार्ट्या करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील सहा तालुक्यातील तालुकाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांना आणि मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिल आहे.

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे हे गटबाजीचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटना बांधणीसाठी त्यांच्याकडून अडचणी निर्माण केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत ओल्या पार्ट्या करतात आणि त्यांच्यासोबत जवळीकही ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांना तात्काळ बडतर्फ करावं अन्यथा आम्ही सर्व उप जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख व जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाचे काम बंद करणार आहोत असा इशाराही या निवेदनात दिला आहे.

शांताराम दाणे हे खासदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या बंडामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटातील या वादाबाबत खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले की, हे पेल्यातील वादळ होते अन् आता पेल्यातच संपेल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!