Home » सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी नाही

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी नाही

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई बारावीचा निकाल शुक्रवार १२ मे २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये देशभरातील ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोविड महासाथीनंतर प्रथमच संपूर्ण शालेय सत्रानिशी परीक्षा झालेली असली तरी अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी यंदा सीबीएसईने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुलांना डिव्हिजन देण्यात आलेले नाहीत.

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत सहा टक्क्यांनी जास्त आहे. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.६७ टक्के आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात ९१.२५ टक्के मुले उत्तीर्ण झाली होती. तर यावर्षी फक्त ८४.६७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी ९४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ ९०.६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. कोविड महासाथीचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!