Home » “हर घर तिरंगा” अभियानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“हर घर तिरंगा” अभियानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by नवस्वराज
0 comment

अकोला : ७७ वा स्वातंत्र्य दिवस काश्मीरसह संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले. राज्यात देखील ठिकठिकाणी  साजरा झाला.

अकोला महानगरपालिकेच्या वतीनं ‘आजादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाचै अंतर्गत, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सर्व शासकीय, निमशासकिय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात तसेच सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. अनेक इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली. महानगरातील विविध भागातून रॅली काढण्यात आल्या. देशभक्तीपर गाण्यांनी वातावरणात उत्साह पसरला होता.

“हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत नागरीकांनी आपापल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला महानगरातील सर्व वर्गाच्या लोकांनी विशेष करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!