Home » Akola : 160 वर्षांचा इतिहास असलेल्या परिसरात साजरा होणार नाताळ

Akola : 160 वर्षांचा इतिहास असलेल्या परिसरात साजरा होणार नाताळ

by नवस्वराज
0 comment

Christmas News : अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमध्ये सोमवारी (ता. 25) नाताळचा सण साजरा करण्यात येणार आहे. अकोल्यातील चर्चेससह सुमारे 160 वर्षांचा इतिहास या कॉलनीला आहे. अकोल्यातील चर्चवर नाताळ निमित्त सजावटीसह सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. (Christmas Celebration in 160 Year Old Colony In Akola City)

सांताक्लॉजच्या वेशातील युवक या काळात मुलांना चॉकलेट आणि इतर भेटवस्तू देणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्त 25 डिसेंबरला हा उत्सव साजरा करण्यात येणार अहे. अकोल्यात अलायन्स मिशनचे चार चर्च आहेत. इतरही मिशनचे प्रार्थनास्थळ आहेत. रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट असे ख्रिश्चन धर्मियांचे दोन पंथ आहेत. जिल्ह्यात 20 हजाराच्या आसपास ख्रिश्चन आहेत. 25 डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठी असते. त्यामुळे ख्रिश्चन धर्मीय मेणबत्त्या पेटवून, नाचून-गाऊन नाताळचा आनंदोत्सव साजरा करतात. 24 डिसेंबरच्या रात्री वॉच नाईट साजरी केली जाते. ख्रिश्चन धर्मीय घरोघरी जाऊन येशू ख्रिस्तांच्या जन्माची गाणी म्हणतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!