Home » Mumbai News : कलम 370 वरील निर्णयावर पाकिस्तान पाठोपाठ चीनचा जळफळाट 

Mumbai News : कलम 370 वरील निर्णयावर पाकिस्तान पाठोपाठ चीनचा जळफळाट 

by नवस्वराज
0 comment

मुंबई | मुंबई : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 वर निर्णय दिल्यानंतर पाकिस्तानचे अंतरिम परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी यांनी गरळ ओकली. त्यापाठोपाठ चीननेदेखील आपली खदखद व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता माओ निंग यांनी चीनच्यावतीने बुधवारी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कलम 370 बाबत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामूळे चीनची भूमिका बदलणार नाही. भारत आणि चीनच्या सिमेचा पश्चिम भाग चीनचा असल्याची आमची मागणी आहे. भारताने बेकायदेशीरपणे निर्माण केलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाला चीनची मान्यता नाही. 2019 मध्ये भारताच्या केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर देखील चीनने अशीच प्रतिक्रिया दिली होती. (China Foreign Ministry Spokesman Mao Ning Stated After Decision Given By Supreme Court Of India On Section 370 That Laddakh Is Our Territory)

माओ निंग पुढे म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. संयुक्त राष्ट्राच्या चार्टरनुसार यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न शांततेने सोडवावा.भारत सरकारने पाकिस्तान आणि चीनची भूमिका फेटाळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अक्साईचीन, गिलगीट बाल्टीस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचा भाग असल्याचे सभागृहात वेळोवेळी सांगितले आहे. केंद्र सरकारने कलम 370 निरस्त केल्यावर चीनने या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला यश आले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!