Home » मोहन भागवत राष्ट्रपिता, राष्ट्रऋषी : ईमामांच्या सर्वोच्च प्रमुखांचे उदगार

मोहन भागवत राष्ट्रपिता, राष्ट्रऋषी : ईमामांच्या सर्वोच्च प्रमुखांचे उदगार

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे राष्ट्रपिता, राष्ट्रऋषी असल्याचे उदगार भारतातील ईमामांची सर्वोच्च संस्था असलेल्या ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांनी काढले. भागवत यांनी आज (२२ सप्टेंबर) दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. त्यानंतर इलयासी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांचीही भेट घेतली. दोघांमधील बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. “मोहन भागवत यांना मी निमंत्रण दिले होते. माझ्या निमंत्रणानंतर ते आले होते. ते राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या भेटीनंतर समाजात एक चांगला संदेश जाईल. देवाचे पूजन करण्याच्या आपल्या पद्धती वेगळ्या आहेत. मात्र मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. देश सर्वप्रथम याला आम्ही महत्त्व देतो,” असे उमर अहमद इलयासी म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीला आज भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी काही लोकांशी चर्चा केली. देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी सरसंघचालक मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.”

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!