Home » Nagpur Winter Session : महाराष्ट्रातील पोलिस दलात होणार बदल

Nagpur Winter Session : महाराष्ट्रातील पोलिस दलात होणार बदल

by नवस्वराज
0 comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील पोलिस दलामध्ये बदल होणार आहेत. 2023 च्या आकृतीबंधानुसार हे बदल करण्यात येणार आहेत. दोन पोलिस स्टेशनमध्ये अंतर, पोलिस स्टेशनमध्ये किती युनिट कार्यरत असतील, एका युनिटमध्ये किती पोलिस असले पाहिजे, असा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दिली. (Changes in Maharashtra Police Force Says DCM Devendra Fadnavis at Nagpur)

स्ट्रीट क्राईम पेक्षा सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्यानुसार नवा आकृतीबंध तयार करण्यात आला असल्याचेही फडणवीस म्हणाले. राज्यात 23 हजार पोलिसांची पदे भरली जाणार आहेत आणि ही अभूतपूर्व भरती आहे, हा भरतीचा रेकॉर्ड आहे. भरती होऊन येणाऱ्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी नवीन यंत्रणा तयार केली आहे. राज्यात 187 नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. नागपूर विभागात सर्वाधिक 47 पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. पोलिसांच्या पुढील वर्षीच्या भरतीसाठी देखील तयारी सुरू आहे. भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलिसांना 8 तासांची ड्यूटी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!