Home » चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचविले

चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचविले

by नवस्वराज
0 comment

चंद्रपूर : 14 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजता गडचांदूर पोलिसांनी 2 दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले. यापूर्वी विरुर पोलिसांनी पुरात अडकलेल्या 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले होते.

वाहनचालकांत 6 स्थानीक तर 16 परप्रांतीय वाहनचालकांचा समावेश आहे. पोलिसांनी जीव वाचवल्यामुळे सर्व वाहन चालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘माल अनलोड केल्यावर आम्ही 2 दिवस कुठेही मुक्काम करतो मात्र सध्या पावसात आम्हाला याबाबत काही अंदाज आला नाही, पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो’, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणाचे सुद्धा काही दरवाजे उघडले असून चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे. अशात धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ 2 दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाही. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्याला अडथळा निर्माण होत होता. अखेर मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्याचा निर्धार करीत मुसळधार पावसात बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरले व एकापाठोपाठ सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!