वाशीम : महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत. यातील ७ लाख महिला घरी परतल्या आहेत. पाच लाख महिलांचा शोध बाकी आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे महिला घरा बाहेर पडू शकत नाहीत. किंवा मुंबई येथे जावू शकत नसल्याने राज्य महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवून आतापर्यंत ३१ जिल्ह्यातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातच नव्हे देशात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री भ्रूण हत्या आजही होत आहेत. राज्यात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे. पण तक्रारी होत नाहीत. त्यासाठी विशेष कायदा करण्याचे प्रयोजन आहे. राज्यातील अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. परंतु ते बंद अवस्थेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कक्ष तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.