अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह सचिवाला या एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एससीबी) अटक केली आहे. कंत्राटाचे बिल काढण्यासाठी या तिघांनी लाचेची मागणी केली होती.
तिघांना अटक करून तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सभापती सुनिल इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले आणि सचिव सुरेश सोनोने ही तिघांची नावे आहेत. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सभापती, उपसभापती आणि सचिव यांनी सभेपूर्वी तक्रारदाराकडून एक लाख रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी सापळा लाऊन बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना अटक आहे. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभापतिपदी सुनिल इंगळे तर उपसभापती प्रा. प्रदीप ढोले हे विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने सहकार पॅनलच्या मदतीने सभापतिपद आपल्याकडे खेचले. उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष सहकार नेते प्रदीप ढोले हे निवडून आले होते.