Home » Nitin Gadkari at Akola : अकोल्यात गडकरी आले, तीन नवीन पूल भेट देऊन गेले

Nitin Gadkari at Akola : अकोल्यात गडकरी आले, तीन नवीन पूल भेट देऊन गेले

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : चांगल्या रस्त्यांमुळेच विदर्भाचा विकास होईल. पश्चिम विदर्भातील रस्त्यांची बहुतांश कामे पूर्ण होत आहेत. लवकरच अकोल्यात तीन नवीन पूल होतील अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. 23) अकोला येथे केली. मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे लोकार्पण व मूर्तिजापूर-कारंजा चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. (Central Minister Nitin Gadkari Gifts New Three Bridges to Akola)

 

यावेळी व्यासपीठावर खासदार भावना गवळी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे आदी उपस्थित होते. चांगल्या रस्त्यांमुळे उद्योग-व्यापार वाढेल, नवीन गुंतवणूक येईल. तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. शेतकऱ्यांना लाभ होईल. यातून विदर्भ सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक अडचणी आल्यात. एल ॲन्ड टी कंपनीने याचे काम घेतले होते. त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आयएल ॲन्ड एफएस कंपनीला याचे काम दिले होते. त्या कंपनीचे दिवाळे निघाले. यामुळे कामाला विलंब होऊन नागरिकांना त्रास झाला. हा रस्ता पूर्णत्वास जात असल्याने त्याचा आनंद आहे. या महामार्गावर विशेषत: सिंचनाची कामे करण्यात आली.

विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पन्न एकरी १५ क्विंटल, तर कापसाचे उत्पन्न २० क्विंटलच्या वर आले पाहिजे. या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जबाबदारी घ्यावी. अपेक्षित उत्पन्न घेणारे शेतकरी विदर्भात आहेत. त्यांना  प्रोत्साहन द्यावे. खारपाणपट्ट्यामध्ये शेतात तलाव करून मत्स शेती करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी तज्ज्ञांमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा देखील नितीन गडकरींनी व्यक्त केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!