नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदा तपकिरी बॉर्डरची लाल रंगाची साडी परिधान केली होती. अर्थसंकल्प सादर करताना दरवर्षी सीतारमण लाल शेडच्या साड्या परिधान करताना दिसतात. यंदा सीतारामण यांनी लाल रंगाची संबळपुरी साडी परिधान केली होती.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८०च्या दशकात संबळपुरी साडी परिधान केल्यानंतर या साडीचे महत्व वाढले होते. त्यानंतर आता निर्मला सीतारामण यांनी ओडिशातील या साडीला पसंती दिल्याने पुन्हा एकदा त्या संबळपुरी साडीमुळे चर्चेत आल्या आहेत. २०२३ मध्ये निर्मला सीतारामण लाल आणि काळ्या बॉर्डरच्या साडीमध्ये दिसल्या. हा रंग शौर्य आणि ताकदीचे प्रतिक आहे. २०२२ मध्ये त्यांच्या साडीचा रंग चॉकलेटी होता. हा रंग सुरक्षेचे प्रतिक आहे. २०२१ मध्ये सीतारमण यांच्यावर लाल साडी दिसली होती. हा रंग शक्ती आणि संकल्पाचा होता. २०२० मध्ये पिवळ्या रंगाच्या साडीला सीतारामण यांनी प्राधान्य दिले. हा रंग ऊर्जेचे प्रतिक होता. २०१९ मध्ये पिंक रंगाच्या साडीतून त्यांनी गंभीरता आणि ठहरावाचा संदेश दिला.