अकोला : ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याची प्रचंड लाट सध्या आली आहे.मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ऑनलाईन वस्तूंचा पुरावठा करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दररोज नवनवीन ऑफर देतात. बऱ्याच वेळी ग्राहकांची फसवणुकदेखील होते. सर्व्हिस सेंटर निवडक शहरात असल्यामुळे वस्तूत दोष निर्माण झाल्यास भयंकर मनस्ताप होतो. यात आता अनेक माॅल्सची भर पडली आहे. येथे टाचणीपासून सर्व काही मिळते. ईतकेच नव्हे तर भाजीपाला, फळेदेखील मिळतात. यामुळे स्थानिक व्यासायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. भाजीपाला व अन्य किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लाॅकडाऊनच्या काळात आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता स्थानिक विक्रेत्यांनीच पूर्ण केल्या आहेत, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे स्थानिक ग्राहकांनी सणासुदीदरम्यानच नव्हे, तर कायम स्थानिक व्यासायिकांकडून खरेदी करणे गरजेचे आहे. स्वदेशीला प्राधान्य द्यावे, ऑनलाइन आणि माॅल्समधुन खरेदी टाळावी. जेणेकरून व्यापारात वृद्धी होऊन रोजगार वाढेल, आपला पैसा परकियांकडे न जाता देशातच खेळेल, असे अनेकांचे मत आहे.