Powered by Embed YouTube Video
अकोल्याचे भाजप खासदार तथा माजी एक केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या सूचनेवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांच्या उपस्थितीत खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आधी सावरकरांचा बारकाईने अभ्यास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात टीकात्मक वक्तव्य केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या सभास्थळी किंवा भारत जोडो यात्रेच्या मार्गात येऊ नये म्हणून खामगाव, शेगावसह यात्रेच्या मार्गात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या आसपास सुमारे 100 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कुमकही शेगाव येथे तैनात करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी पोलिसांनी दोराच्या साह्याने सुरक्षा कवच तयार केले आहे. दोराच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्था कमांडोच्या साह्याने पाहण्यात येत असून राहुल गांधी यांच्या जवळपास केंद्रीय विशेष सुरक्षा पथकाचे जवान तैनात करण्यात आली आहेत.