अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. ‘जिल्ह्यात पक्ष नंबर एक ठरला आहे. मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टीने सार्थ करून ग्रामीण विकास करण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी यशस्वी ठरतील’, असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल आणि भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, , पंचायत समिती सदस्यांच्या विकास कार्याला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. भाजपचे १०४ ठिकाणी समर्थित उमेदवारांसह १२३ सरपंच, ६२७ ग्रामपंचायत सदस्य विजयी ठरले.
विजय मिळविणारे उमेदवार
टाकळी : विनोद पाथरीकर, हिंगणी : दीपाली वाघ, दापूर : मुक्ता शेंडे, पिवंदळ बु. : शांताराम काळे, तळेगांव खु. : सुनंदा वाकोडे,
कोठा : विठ्ठल नाफडे, वारखेड : मंगला अरदडे, खापरखेड : संतोष काकड, बाभुळगाव : मिनाक्षी कोकाटे, उकळी बाजार : पुंजाबाई सोळंके, दहीगाव : रवीकिरण काकड, भोकर : मोहन गावंडे, शेरी बु. : नीता खंडाळकर, पळोदी : दुर्गादेवी वासुदेव वक्ते, कंचनपूर : मिनाक्षी शेळके, अमानतपूर : सुमित्रा कात्रे, निराट : प्रिया सराटे, निपाणा : मनीष वर्गे, वाशिंबा : विशाल सोळंके, नवथळ : राहुल तेलगोटे, टाकळी जलम : रेणुका नारायण बोर्डे, सांगवी मोहाडी : किशोर पांडव, सुकोडा : वैशाली वाडेकर, कानडी : विजय बावाने, कासली खु. : मयुरी गणेश काळमेघ, सिसा : नंदकिशोर गोरले, चांगेफळ : अंकुश इंगळे, कापशी तलाव : सुनिता चतरकर, रामगाव : शोभा गावंडे, गोपाळखेड : आशा जाधव, दोनवाडा : श्रीकृष्ण झटाले, खरप खु. : हर्षल गोंडचवर, वरुडी : उषा खंडारे, खडका : पुष्पा प्रमोद गोगटे, दुधलम : शंकर महल्ले, कळंबेश्र्वर : युतीच्या अर्चना अनिल निकामे यांनी विजय मिळविला.
ग्रामपंचायत उमेदवार
तांदळी खु. : गणेश महल्ले, खामखेड : नंदाताई काळे, चोंढी : विष्णू ठाकरे, माळराजूरा : गणेश राठोड, सावरखेड : माया काटे, गावंडगाव : दिलीप जाधव, झरंडी : रीतेश जाधव, नवेगाव : गजानन डाखोरे, पाडशिंगी : शोभा सरकटे, मांडवा : भाऊराव हिवराळे, मोरझाडी : दीपाली फुकट, मोखा : मयुरी खराप, कुपटा : सहदेव नळकांडे, बारलिंगा : सुनिता अवातीरक, वझेगाव : राजेश माळी, मारेगाव सा. : वसंत सोळंके, रसलापूर : सुरेखा वैध, रामटेक : रुपाली ठाकरे, लोनसरा : पूजा बांगड, दहातोंडा : उमेश चव्हाण, शेलू बोंडे : शुभांगी बोंडे, शिवणी खु. : सुवर्णा भारप्ते, मुरंबा : धनश्री भटकर, नागोली : गिता पवार, दापुरा : विजया पाथरे, राजंदा : सुखदेव आखरे, शेरवाडी : पल्लवी सदार, बोर्टा : पंकज सावळे, अकोला जहाँ. : ज्योती दावेदार, राजनापूर : योगेश सावळे, सांगवा मेळ : पुष्पा गावंडे, खोडद : मालती ननीर, कोळसना : शैला कडु विजयी झालेत.