Home » अकोल्यात भाजपने साजरी केली साधेपणाने दिवाळी

अकोल्यात भाजपने साजरी केली साधेपणाने दिवाळी

by नवस्वराज
0 comment

अकोला : गरीब व गरजू लोकांसोबत भाजपचे कार्यकर्ते पारावरची दिवाळी साजरी करतील अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानुसार अकोला भाजपने अत्यंत साधेपणाने हा दिवाळी उत्सव साजरा केला.

अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने दीपपर्व साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली. शहरातील व जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील वंचित, पीडित, मातृशक्तीला भेटवस्तू, फराळाच वाटप यावेळी करण्यात आले. भाजपचा विस्तार आगामी निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापना करण्याची कामना व आशीर्वाद त्यांनी यावेळी जनतेकडुन घेतले. बोरगाव मंजू तसेच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आदिवासी वंचित समाजांना दीपावलीच्या शुभेच्छा आमदार सावरकर यांनी दिल्या. त्यांच्यासोबत किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, माधव मानकर, जयंत मसने, अनुप धोत्रे आदी उपस्थित हाते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!