अकोला : ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच शेतकरी सुखी संपन्न व्हावा, शेतकऱ्यांचा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी दळणवळणाची सोय, मूलभूत सुविधा सरकार उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. कापशी-माझोड रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला अनुप धोत्रे, तेजराव थोरात, ज्येष्ठ नागरिक नागोराव चतरकर, राजेश ठाकरे, सरपंच सुनिता चतरकर, माझोडच्या संरपच पुष्पा बोबडे, उपसरपंच शैलेश येवले, उपसरपंच अमोल मामनकर पाटील, शारदा खंडारे, सिद्धेश्वर लोणकर, अरुण चतरकर, पुंडलिक बराटे, बबलू पाटील, विठ्ठल थोरात, सचिन फेंड, शिवलाल ताले, कन्हय्या यादव, मोरू भय्या, देवीदास खाकरे, गणेश अंगरखे, पुरुषोत्तम चतरकर, शरद पाटील, शिवलाल ताले, दुर्वास पाटील, वैभव डिवरे, शिवाजी चतरकर, जनार्दन खंडारे, दगडू मानतकर, गजानन तिखिले, मंगेश पाटेखेडे, राजू हागे आदी उपस्थित होते.
अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सर्व क्षेत्रांचा विकास करण्याच्या दृष्टीने व ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार पंचसुत्रीवर काम करीत असल्याचे ते म्हणाले. आमदार सावरकर विकास कामांसोबत जनतेच्या व्यक्तीगत व सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व असल्याचेही धोत्रे यांनी यावेळी सांगितले.