Home » भारत विकास परिषदेने विद्यार्थ्यांना पटवून दिले पर्यावरण संवर्धनाचे महत्व

भारत विकास परिषदेने विद्यार्थ्यांना पटवून दिले पर्यावरण संवर्धनाचे महत्व

by नवस्वराज
0 comment

नागपूर : भारत विकास परिषद-स्मार्ट सिटीच्या नागपूर शाखेतर्फे हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील यशवंत हायस्कूल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

भारत विकास परिषद स्मार्ट सिटीतर्फे अध्यक्षा रंजना लाभे, उपाध्यक्ष अजिता डोरलीकर, सचिव श्रुती देशपांडे, संस्कार प्रमुख संजय डबली, संस्थेचे पालक शशिकांत सुरंगळीकर आणि ग्रामविकास प्रमुख संतोष आत्राम उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक विश्वजित बोनधाटे, सुपरव्हायजर शयाम बोबडे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. झाड का बरं लावली जगवली पाहिजे, पावसाळ्यातच झाड का लावावी, झाड आपल्याला काय देतात अश्या अनेक विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. गुमगाव-वाघदरा हे ग्राम भाविप स्मार्ट सिटी शाखेने दत्तक घेतले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!