Home » Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत मोठा गोंधळ

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत मोठा गोंधळ

Bharat Jodo Nyay Yatra : सभेला बड्या राजकीय नेत्यांची उपस्थीती

by नवस्वराज
0 comment

Nashik : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आली असता. या ठिकाणी  रोड शो आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत इंडिया आघाडीचे नेते सहभागी झाले. मात्र, या यात्रेत मोठा गोंधळ झाला. सभेपूर्वीच इंडिया आघाडीतील मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्षाचे नेते आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे समजते. या मुळे सभा स्थळी मोठा गोंधळ उडाला होता.

राहुल गांधी यांच्या सभेसाठी शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले आणि सर्वच इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील मोठे नेते येणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक होती. माकप सुद्धा इंडिया आघाडीतील एक घटक पक्ष आहे. दरम्यान, या यात्रेसाठी माकपचे आमदार जे. पी. गावित हे आले असता. त्यांना, राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी अडवून धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला.

राहुल गांधी यांच्या सभेसाठी ज्या नेत्यांची यादी बनवण्यात आली होती. त्यामध्ये माकपचे नेते आमदार जे. पी. गावित यांचं देखील नावं होतं. या सभेला उपस्थित राहण्यासाठी गावित सभास्थळी पोहोचले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं. त्यानंतर तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून जे. पी. गावीत यांना धक्काबुक्की करण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!