Bhandara | भंडारा : भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सावंगा गावाजवळ भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. तर आमदार भोंडेकर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. (Bhandara news MLA Bhondekar’s convoy vehicle met with a terrible accident)
आमदार नरेंद्र भोंडेकर आपले स्वीय सहाय्यक संजय शेगोकार यांच्या वडिलांच्या निधनानंतर आयोजित चौदावीच्या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले होते. दिग्रस तालुक्यातील सावंगा गावाजवळ त्यांचा ताफा आला असताना पोलिसांचे ‘एस्कॉर्टिंग’ वाहन, ऑटो आणि दुचाकी यांची धडक झाली. टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.