Home » Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, मराठा आरक्षण सात दिवसात द्यावे लागेल!

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, मराठा आरक्षण सात दिवसात द्यावे लागेल!

by नवस्वराज
0 comment

Amravati | अमरावती : मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंतची वेळ सरकारला दिली आहे. या मुदतीच सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे. अशात जरांगे यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. अमरावती येथे ते बोलत होते. (Bacchu Kadu Warns Government at Amravati On Maratha Reservation)

राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना वेळ मागितली होती. त्यानुसार आता केवळ आठवडाभराचा कालावधी सरकारजवळ शिल्लक आहे. सरकारने जरांगे यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी केली.

सरकारनं मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणताही दगाफटका केल्यास आपण स्वत: आंदोलनात सहभागी होऊ, असं आपण आधीच जाहीर केलय. आता सात दिवसात आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालच तर आपण आंदोलनात सर्वांत पुढं असू मग आपण सरकारचा कोणताही मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय. त्यामुळं आता सरकारवर मराठा आरक्षणासाठी मोठा दबाव निर्माण झालय.

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काम करीत आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती प्रमाणपत्रांसाठी काम करत आहे. आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी आढळल्या आहेत. अशा परिस्थितीत शिंदे समिती आणि सरकार नेमकं काय करीत आहे, हे त्यांनी स्पष्ट करणं नितांत गरजेचं आहे, असंही आमदार कडू म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!