Mumbai | मुंबई : व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तान इंटलिजन्स ऑपरेटिव्ह च्या (PIO) एजन्टशी संपर्कात असलेल्या गौरव पाटील (वय 23) याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. आरोपी गौरव हा नेव्हल डॉकमध्ये सिव्हिल अप्रेंटिस म्हणून कार्यरत आहे. भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीला पुरवल्याचा गौरववर आरोप आहे. ( ATS Of Maharashtra Arrested Gaurav Patil For Sharing Secret Information Of Indian Government To Pakistan Agency PIO) महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या प्रकरणात एकूण चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्य तीन आरोपी हे गौरवच्या संपर्कात असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे.