Home » Communal Tension : आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले

Communal Tension : आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले

Police Action : सोशल मीडियावरील मेसेजनंतर कारवाई

by नवस्वराज
0 comment

Buldhana : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे. त्याने समाज माध्यमावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकला. ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी घेतली. पडताळणी नंतर खेर्डे याला निलंबित करण्यात आले. निलंबन आदेश सोमवारी संध्याकाळी काढण्यात आले.  तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!