नागपूर : नागपुरातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना पक्षाच्या शीस्तपालन समितीने नोटीस बजावली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे निलंबित का करण्यात येऊ नये, असे स्पष्टीकरण या नोटीसमध्ये विचारण्यात आले आहे.
नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर असे गंभीर आरोप केले होते. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी केला होता. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आशिष देशमुख यांना पक्षाविरोधात बोलल्याचा फटका आशिष देशमुख यांना बसला आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने तीन दिवसात कारणे दाखवा नोटीस देत पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.
माझे पक्षातून निलंबन करणे चुकीचे आहे. पक्षाच्या हिताच्या गोष्टी करत होतो. तरीही मला नोटीस पाठवण्यात आली. त्याचं उत्तर वेळेआधी मी शिस्तपालन समितीला पाठवेन. असे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सांगितले.