अमरावती : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वातंत्र्य दिनी राज्यात भगवा रॅली काढणार आहेत. या रॅलीला विरोध होत आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडेंना अटक करा, अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त विधाने करीत आहेत. नुकतेच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
“तिरंगा” हा देशाचा अभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही, स्वातंत्र्य दिनी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करणे गरजेचे आहे,” असे यशोमती ठाकूर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
“महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत.” असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. भिडे यांच्या वक्तव्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भिंडेंच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. “संभाजी भिडेंचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोप यावेळी तुषार गांधी यांच्याकडून करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर दुसरं बोलतात, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले.