Home » प्राध्यापक हत्याकांडातील आर्मीमॅनला कोठडी

प्राध्यापक हत्याकांडातील आर्मीमॅनला कोठडी

by नवस्वराज
0 comment

अकोला : १८ जून रोजी उशिरा रात्री सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आर्मीमॅनची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने, त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रा. इंगळे यांच्याशी जुना वाद होता, परंतु त्यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता, असे मारेकऱ्याने सांगितले आहे.

रागाच्या भरात हातून खुनासारखे कृत्य घडल्याची कबुली आर्मीमॅनने पोलिसांना दिली. प्रा. रणजीत इंगळे हत्याकांड प्रकरणात जुने शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने दिल्ली येथील एक आर्मीमॅन सचिन भाग्यवान चक्रनारायण (३५, रा. शिवणी) याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली असून, प्रा. रणजीत इंगळे यांच्या हत्येमागील कारण समोर आले आहे , दोघांमध्ये एका वादातून अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. परंतु त्यांना जीवाने मारण्याचा उद्देश नव्हता. केवळ जखमी करून त्यांना धडा शिकवावा, असे ठरविले होते. परंतु राग अनावर झाल्याने, त्यांची हत्या घडल्याचे आर्मीमॅन सचिन चक्रनारायण याच्या कबुली जबाबातून समोर आले आहे. पुढील तपास जुने शहरचे ठाणेदार नितीन लेव्हरकर करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!