Home » गांधीवाद्यांची गटबाजी संपावी म्हणून ८० वर्षीय व्यक्तीचे उपोषण

गांधीवाद्यांची गटबाजी संपावी म्हणून ८० वर्षीय व्यक्तीचे उपोषण

by नवस्वराज
0 comment

वर्धा : महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले आबा कांबळे यांनी गांधीवाद्यांतील गटबाजी संपुष्टात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आबा ८० वर्षांचे असून त्यांनी उपोषण सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सर्व सेवा संघ यावर वर्चस्व मिळवण्यासाठी चंदन पाल व महादेव विद्रोही या दोन ज्येष्ठांत वाद सुरू आहेत. अशात पाल गटाने आशाताई बोथरा यांना तर विद्रोही गटाने आबा कांबळे यांना अध्यक्ष घोषित करून टाकले. सध्या बोथरा अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्यामुळे कांबळे यांनी दोन्ही गट एकत्र यावेत म्हणून बापूप्रणित सत्याग्रहाच्या मार्ग अवलंबला आहे. वयाच्या ऐंशीच्या वर्षी कांबळे यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कांबळे यांची भूमिका मान्य असून त्यांनी पाच सदस्यीय समितीपुढे आपले म्हणणे मांडावे अशी विनंती समिती सदस्यांनी कांबळे यांना केल्याचे अविनाश काकडे यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!