अमरावती : खासगी कंपनीत असलेली लाखो रुपय वेतनाची नोकरी सोडून प्रयत्नांची परकाष्ठा करणारी पल्लवी सुखदेव चिंचखेडे ही आयएएस झाली आहे.
नुकत्याच लागलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने उत्तम रँकिंग मिळविले. आपल्या आई-वडिलांच्या कष्ट चीज करीत पल्लवीने अटकेपार झेंडा रोवला आहे. पल्लवीने बी. ई. मेकॅनिक पर्यंत शिक्षण अमरावती येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये लाख रुपयांच्या नोकरीवर आपल्या करिअरची सुरुवात केली. नोकरीव्यतिरिक्त काहीतरी करून देशसेवा करण्याचे स्वप्न तीने मनी बाळगले होते. तीने त्यावर काम सुरू केले. लाख रुपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि दिल्ली येथे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अथक प्रयत्नातून पल्लवीने परीक्षेत यश मिळविले.