अमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापित केलेल्या श्री शिवाजी शिक्षणद्वारा संचलित असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव्ह बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
बँकेच्या 17 संचालक पदांसाठी 11 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी 13 उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यामध्ये प्रफुल राऊत, गिरीश भारसाकडे, दिलीप कोकाटे, संजय कोल्हे, विलास हरणे, विनायक गावंडे, सुरेंद्र कडू , संजय देशमुख, प्रकाश घाटे, साधना गणेशपुरे, हेमलता चौधरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी साधारनतः सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मंडळी तसेच शिव परिवारातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.