Home » अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक महिला बेपत्ता; तरूणींचे प्रमाण जास्त

अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक महिला बेपत्ता; तरूणींचे प्रमाण जास्त

by नवस्वराज
0 comment

अमरावती : पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात अमरावती जिल्हा आघाडीवर आहे.

अमरावती जिल्ह्यातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये तरुण मुलींचाही समावेश आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यात 3 महिन्यात 815 महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. प्रेमप्रकरणातून घरातून निघून जाणे, पती किंवा सासरच्या मंडळींशी मतभेद, लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेणे अशी काही प्रमुख करणे या घटनांमागे असल्याचे पुढे आले आहे. महिलांविषयक अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आता राज्यस्तरावर स्वतंत्र तपास यंत्रणेची गरज भासत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!