New Delhi | नवी दिल्ली : भारतात विविध धर्म, जातीचे लोक राहतात. आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वा विरोधात कुठलेही कृत्य केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा केंद्र सरकारचा संदेश आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील ही बाब स्पष्ट केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, ‘मुस्लिम लीग जम्मू- काश्मिर (मसरत आलम गट) (MLJK-MA) या संघटनेला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित केले आहे. ( Amit Shah Declared Muslim League Jammu- Kashmir MA Group Has Been Banned Under UAPA)
बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा अध्यक्ष तसेच ऑल पार्टीज हुर्रियत काॅन्फरन्सचा (गिलानी गट) अंतरिम अध्यक्ष मसरत आलम भट हा 2019 पासून तिहार तुरूंगात आहे. मुस्लिम लीग जम्मू काश्मिर (मसरत आलम गट) आणि त्याचे सदस्य जम्मू-काश्मिर मध्ये इस्लामी राजवट स्थापन करण्यासाठी दहशतवादी कारवायांचे समर्थन करते व ते तेथील लोकांना भडकावतात. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.