Home » Ram Mandir : अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत झाले अक्षता कलशाचे पूजन 

Ram Mandir : अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत झाले अक्षता कलशाचे पूजन 

by नवस्वराज
0 comment

Akola : अयोध्या धाम येथील श्री रामलल्ला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (ता. 12) भाजप अकोलातर्फे मोठे राम मंदिर येथे ‘हर घर अक्षता कलश पूजन व श्रीराम ज्योत पूजन’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप नेते अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर मांगटे पाटील यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. अक्षता कलश व श्रीराम ज्योत पूजन करून प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद सर्वांवर अखंड राहावा, सर्वांना सुख-समृद्धी लाभावी अशी प्रार्थना यावेळी अनुप धोत्रे यांनी केली.

भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चनाताई मसने, माजी महापौर सुमनताई गावंडे, विजय मालोकार, सिद्धार्थ शर्मा, राजेंद्र गिरी, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, संतोष पांडे, वैकुंठराव ढोरे आदी पदाधिकारी व सर्व धर्मप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक घरात अक्षता कलश पूजन व श्रीराम ज्योत पूजन, व्हावे असे आवाहन यावेळी अनुप धोत्रे यांनी केले. देश-विदेशातील तमाम श्रीराम भक्तांचे अनेक वर्षांपासूनचे मंदिर निर्माणाचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. अयोध्या नगरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायापालट केला आहे, असे अनुप धोत्रे यावेळी म्हणाले.

अयोध्यातील भव्य दिव्य श्रीराम मंदिराकडे पाहिल्यावर रामराज्य काय होते, याची एकूणच कल्पना येते. 22 जानेवारीला जगभरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील श्रीराम भक्तांनीही या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी भाजप नेते अनुप धोत्रे यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!