Home » Akola MLA Govardhan Sharma : आमदार गोवर्धन शर्मांचा उत्तराधिकारी कोण?

Akola MLA Govardhan Sharma : आमदार गोवर्धन शर्मांचा उत्तराधिकारी कोण?

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : सलग सहा वेळा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार गोवर्धन शर्मा हे लालाजी या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. मोबाईल न वापरता त्यांचा मतदारसंघात प्रचंड जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त झाली आहे. (Akola West Assembly Constituency Seat Got Vaccant After Dimise OF BJP MLA Govardhan Sharma)

चंद्रपूर व पुणे लोकसभेच्या जागा तेथील लोकसभा सदस्यांच्या निधनामुळे रिक्त झाल्यात. परंतु तेथे पोटनिवडणूक घेण्यात येणार नाही. कदाचीत अकोलाची पोटनिवडणूक देखील टळू शकते. अकोला पश्चिम हा भारतीय जनता पार्टीचा मागील २८ वर्षांपासून अभेद्य गड आहे. परंतु आता प्रश्न निर्माण झाला आहे की, आमदार गोवर्धन शर्मा यांचा उत्तराधिकारी कोण असेल.

भारतीय जनता पार्टीची अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात स्थिती चांगली असली, तरी दुसरी दमदार फळी निर्माण केलेली नाही. त्यामुळे पक्षासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसे पक्षातील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु आमदार शर्मांचा दाणगा जनसंपर्क ही त्यांची मोठी राजकीय गुंतवणूक आणि जमेची बाजू होती. त्यांच्या आवाक्याच्या जवळपास असणारा कोणताही उमेदवार पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला अकोला पश्चिम विधानसभेवर मेहनत घ्यावी लागेल. आता मतदारांना गृहीत धरून चालणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!