Akola | अकोला : अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेने 60 वर्ष पूर्ण केली आहेत. 2023-2024 हे हीरक महोत्सवी वर्ष म्हणुन साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर रविवारी संपन्न झाले.(Akola Urban Cooperative Bank Has Completed 60 Years 2023-2024 Will Be Celebrated As Diamond Jubilee Year)
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, प्रमुख वक्ता प्रकाश पाठक, अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, सचिव हरीश लाखाणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के होते.
सहकार भारतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्व सहकारी बॅंकांच्या समस्या ऐकण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली. हीरक महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. बॅंकेला शिखरावर न्यायचे असल्यास छत्रपती शिवरायांची कार्यशैली आणि त्यागाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे लागेल असे प्रकाश पाठक म्हणाले. कार्यक्रमाला संचालक मंडळ, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील 34 शाखांचे शाखाधिकारी, शाखा निरीक्षक समितीचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.