अभिजित कराळे
Akola : अकोल्यात 11 जानेवारी गुरूवार रोजी श्रीरामलला मंदिर अक्षद वितरण समितीतर्फे आळशी प्लाॅट भागात अक्षद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समितीचे कार्यकर्ता आणि नागरीकांनी कलश पूजन करून अक्षद वितरण कार्याला सुरुवात केली. यावेळी भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली. श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह बाहुबली हनुमान यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Akola Shri Ramlala Akshad Vitaran Samiti Procession Marched)
शोभायात्रेचे रांगोळ्या काढून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आदर्श चौक, एनसीसी ऑफिस, नेहरूपार्क चौक, टीव्हीएस शोरूम, खंडेलवाल भवन, रेमंड-शोरूमवरून मार्गक्रमण करत घरोघरी अक्षद वितरण करण्यात आले. रात्री 7 वाजता आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत अक्षद कलश नागरीकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. रामभक्तांनी मोठ्या संख्येने कलशाचे दर्शन घेतले.