Akola : अकोला जिल्ह्यात महिला व विध्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी अकोला पोलिस दल विविध योजना राबवित आहे. अकोला शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी एकच दामिनी पथक कार्यरत होते. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतुन आता संपूर्ण जिल्हात दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने 34 वाहने उपलब्ध करून दिली. त्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते 7 मार्च रोजी ‘राणी महल, पोलीस लॉन, अकोला’ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधीकारी अजित कुंभार,मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जिल्हा परिषद बी. वैष्णवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे स्वागत व सत्कार तसेच कार्यक्रमाचे प्रास्तावीक पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले. आपल्या प्रास्तावीकात सिंह यांनी दामिनी पथकाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती दिली. शहर व ग्रामीण भागात महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षेकरीता हे पथक कार्यरत राहिल असे बच्चन सिंह यांनी सांगीतले. कार्यक्रमाची सुरवात अकोला पोलिसांची शॉर्ट फिल्म ‘दामिनी’ ने करण्यात आली. त्यांनतर अॅड मनिषा धुत, डॉ. सोनखासकर, अॅड रेवती राठोड, पोलिस निरीक्षक उज्चला देवकर यांनी आपले विचार मांडले, मान्यवरांच्या हस्ते दामिनी पथकाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर दामिनी पथकाचे कामकाज कसे राहिल यावर एक चित्रफीत दाखविण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते 34 दुचाकी वाहनांचे ‘दामिनी मार्शल’ चे हिरवी झेंडी दाखवुन लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी तत्काळ वाहने उपलब्ध करून दिले त्याबददल पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांचे हस्ते अजित कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अजित कुंभार म्हणाले की, विधायक कामासाठी अकोला प्रशासन नेहमी सकारात्मक आहे. त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी यावेळी आपल्या जिवनातील अनुभव कथन केले. परिस्थिती कशीही असली तरी दामिनी बनुन आपले कार्य करावे असे विचार त्यांनी प्रकट केले. पोलिस विभागाच्या या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या महिला कु. सोम्या गुप्ता, महिला पोलिस कॉन्सटेबल पुजा भटकर, कु. मिनाक्षी मुकुंदे, प्रिती मोहोड, रोशनी अस्वार, पोलिस निरीक्षक प्रविण तायडे मोटर परिवहन विभाग, तसेच पोलिस स्टेशन स्तरावर उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या 47 महिला पोलीस अंमलदार यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. स्वप्ना लांडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शहर पोलिस उपअधिक्षक सतीष कुळकर्णी, पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील महिला दक्षता समीती सदस्य, एन.जी.ओ. तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.