अकोला : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचे नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अकोल्यात भाजपच्या शहराध्यक्षपदी जयंत मसने यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर मांगटे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. बुधवारी विदर्भ आणि मराठवाडा भागातील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील इतर प्रदेशातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या गावाची घोषणा करण्यात आली.