Home » Akola Gurupurab : गुरू तेगबहादरजी यांचा बलिदान दिवस होणार साजरा 

Akola Gurupurab : गुरू तेगबहादरजी यांचा बलिदान दिवस होणार साजरा 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे शिखांचे नववे गुरू श्री तेगबहादरजी यांचे शहिदी गुरूपुरब (बलिदान) दिवस 2 डिसेंबर 2023 शनिवारी न्यु राधाकिसन प्लॉट मधील हिंदू-शिख एकतेचा प्रतिक असलेला गुरुद्वारा श्री गुरूजी तेगबहादरजी येथे श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येणार आहे. ( Akola Martyr Guru Tegbahadarji Shahidi Gurupurab Will Be Celebrated On 2 December)

श्री गुरूग्रंथ साहिब पाठाची समाप्ती सकाळी 10.30 वाजता गुरूद्वारात होईल. गुरूद्वारासिंग सभाचे हजुरी रागीभाई रविंदरसिंग, विजयसिंग, महिंदरसिंग यांचे शबद, कीर्तन, प्रवचन सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 पर्यंत अग्रसेन भवन येथे होईल. त्यानंतर गुरूका लंगरचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी गुरूसिंग सभाचे अध्यक्ष रामिन्दरसिंग छतवाल व पदाधिकारी, जसवंतसिंग मल्ली, गुरूचरणसिंग बेदी, जगजीतसिंग विरक, इन्दरजितसिंग गुजराल, प्रकाश सराफ, कैलास हिवराळे, अमरीकसिंग राठोड परिश्रम घेत आहेत. सर्व शिख व हिंदू धर्मप्रेमी बांधवांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरूमीतसिंग गोसल यांनी आयोजन समितीतर्फे केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!