अकोला : गांधीग्राम येथील अकोला अकोट महामार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला खालच्या बाजूने तडे गेल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोल्यातील गांधीग्राम येथे अकोला अकोट महामार्गावर ब्रिटिशकालीन पुल आहे. या पुलाला तडे गेल्याने पुलावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला-अकोट अंतर कमी असल्याने या महामार्गवरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होत असते. आता हा मार्ग अचानक बंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होणार आहे. याच महामार्गावर पर्यायी पुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे वाहनाधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे.