अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये राबविण्यात आलेल्या समाजाला उपयोगी अशा विविध योजनांचे चित्रीकरण विद्यार्थ्यांनी कलाकृतीने काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा व योजना जनप्रयोगी असल्याचा प्रत्यय कृतीने दिला आहे असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केले.
रेणुका नगरातील राजेश्वर कॉन्व्हेंट विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कला आणि संस्कृती सोबत मानव कल्याणाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविली आहे. राजेश्वर कॉन्व्हेंट विद्यालय व आयोजन समितीचा उपक्रम समाजाला प्रेरणादायी असल्याचे आमदार खंडेलवाल म्हणाले.
खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, अनुप धोत्रे, अर्चना मसने यांच्या प्रमुख उपस्थितीत, अकोला महानगरात कला व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला पश्चिम मतदार संघातील वर्ग आठवी ते बारावीमधील ५२५ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजयी स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी किशोर मांगटे पाटील, विजय मालोकार, विष्णु मेहेरे, माधव मानकर, संजय गोटफोडे, संजय जिरापुरे, संजय गोडा, गिरीश जोशी, विलास शेळके, पवन महल्ले, सतीश ढगे, तुषार भीरड, नीलेश निनोरे, संतोष पांडे, अमोल गोगे, वैभव मेहेरे, चंदा शर्मा, प्रा. स्मिता पारस्कर, रूपाली कुलकर्णी मॅडम, वरणकर मॅडम, माजी महापौर सुमन गावंडे, माजी महापौर अश्विनी हातवळणे, रंजना विंचनकर, साधना येवळे, मंगला मसने, रश्मरी कायंदे, विजय देशमुख, ज्योती मानकर, विनोद मापारी, व्यकुंठ ढोरे, बिसेन सर, विक्की ठाकूर, उज्ज्वल बामनेत, अभिजित बांगर, कुणाल शिंदे, सुनिल उंबरकर, उकंठ सोनोने, हरीभाऊ काळे, नीतेश पाली, सचिन मुदीराज, अनुप गोसावी, सतीश येवले, अभिषेक भगत, रितेश जमनारे, भूषण इंदोरीया, आदित्य वानखडे, महेश गोधळेकर, विक्की भिसे, राहुल धोटे आदी उपस्थित होते.