अकोला : बार्शिटाकळी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या परिवाराने केल्यानंतर हा प्रकार ‘लव्ह जिहाद’ असल्याची शंका व्यक्त होत आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय क्षत्रीय महासभेने केली आहे. यासंदर्भात अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय क्षत्रीय महासभेने आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल यांनाही निवदेन दिले. निवेदनात बार्शिटाकळी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. २० ऑगस्टला ही मुलगी बेपत्ता झाली होती.
अखिल भारतीय क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष डॉ. अजयसिंह चव्हाण, महासचिव रमणसिंह पाटील, रामप्रकाश मिश्रा, विनोदसिंह ठाकूर, मनोजसिंह बिसेन, मनीषसिंह बिसेन, निखिल ठाकूर, गुरूचरणसिंह यदू, गोपालसिंह ठाकूर, प्रेमसिंह ठाकूर, पवनसिंग ठाकूर, मुन्ना ठाकूर, सचिनसिंह ठाकूर, तिलक ठाकूर, रोहितसिंह ठाकूर, नीलेश ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.