Home » Akola News : अजेय महिला शक्ती संमेलन उत्साहात 

Akola News : अजेय महिला शक्ती संमेलन उत्साहात 

by नवस्वराज
0 comment

अकोला | अकोला : स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहात रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.00 या वेळात अजेय महिला शक्ती संमेलन संपन्न झाले.(Ajeya Mahila Shakti Sammelan Organized On 17 December At Akola)याप्रसंगी प्रमुख अतिथी उद्योजिका स्नेहल ढवळे तर प्रमुख वक्त्या मिसेस इंटरनॅशनल वर्लड हेरिटेज पूर्वा थोरात होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक स्त्री विशिष्ट असून तिच्यात काही विशिष्ट गुणांचा समुच्चय असतो. त्यांना ओळखण्यासाठी, वाव देण्यासाठी आणि या गुणांच्या मदतीने स्वतःचा, समाजाचा तसेच देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकास करण्यासाठी एकत्र येणे आणि व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संमलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे थोरात म्हणाल्या. शिक्षण, संस्कार, कुटुंब आणि करियरचा समतोल साधता येणे म्हणजे महिला सक्षमीकरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. लघु उद्योजकांच्या स्टॉल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधले. संमेलन तीन सत्रात पार पडले. ज्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, स्वास्थ, महिला सुरक्षा या क्षेत्रातील रेखा खंडेलवाल, तारा हातवळणे, डाॅ. उत्पला मुळावकर, पल्लवी कुळकर्णी, डाॅ. भारती राठी, मोहिनी मोडक, अनुराधा बाहेती व कल्पना पांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सर्वांसाठी खुले आणि नि:शुल्क आयोजनाचा लाभ जिल्ह्यातील 1 हजार 300 महिलांनी घेतला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका आरती लढ्ढा, मिरा कडबे, सहसंयोजिका सरिता शर्मा, कांचन हरणे, कोमल चिमनकार, डाॅ. सुजाता मुलमुले मार्गदर्शक लता किडे, चित्रा बापट यांनी सहकार्य केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!